श्री शांडिल्य महाराज मठ, लोंढा
श्री शांडिल्य महाराज मठ, लोंढा।
!! श्री गणेशाय नमः !!!! ओम नमः शिवाय !!
!! श्री शांडिल्य महाराज प्रसन्न !!
श्री शांडिल्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने थोडक्यात मिळवलेली माहीती आपल्या समोर मांडत आहे । श्री शांडिल्य महाराजांच्या माहीती विषयी काही चुकले असल्यास क्षमस्व व या पेक्षा ही चांगली सेवा करण्यासाठी प्रयत्न करण्यास संधी द्यावी, ही विनंती।
खानापूर तालुक्यातील लोंढा या गावी श्री सद्गुरू शांडिल्य महाराजांच्या मठ आहे। या मठामध्ये श्री सद्गुरू शांडिल्य महाराजांचा जत्रोत्सव व पुण्यतिथी साजरी करण्यात येते। माघ कृष्ण ७, ८, ९, या तिथी मध्ये लोंढा येथे महाराजांचा पालखी सोहळा, जत्रोत्सव व विविध धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमाने साजरी करण्यात येते। या यात्रेनिमित्त लोंढा गावातील, पंचक्रोशीतील व बाहेर गावातून मंडळी श्री सद्गुरू शांडिल्य महाराजांच्या दर्शनार्थ येऊन आपापले मनोकामना त्यांच्या पुढे मांडून यात्रेचा लाभ मिळवतात।
खानापूर तालुक्यातील लोंढा या गावी श्री सद्गुरू शांडिल्य महाराजांच्या मठ आहे। या मठामध्ये श्री सद्गुरू शांडिल्य महाराजांचा जत्रोत्सव व पुण्यतिथी साजरी करण्यात येते। माघ कृष्ण ७, ८, ९, या तिथी मध्ये लोंढा येथे महाराजांचा पालखी सोहळा, जत्रोत्सव व विविध धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमाने साजरी करण्यात येते। या यात्रेनिमित्त लोंढा गावातील, पंचक्रोशीतील व बाहेर गावातून मंडळी श्री सद्गुरू शांडिल्य महाराजांच्या दर्शनार्थ येऊन आपापले मनोकामना त्यांच्या पुढे मांडून यात्रेचा लाभ मिळवतात।
या मठामध्ये श्री सद्गुरू शांडिल्य महाराजांनी स्वतः श्री रामलिंगाची स्थापना केली आहे। हा मठ पांढरी नदीच्या तीरावर आहे, या मठाला शांडिल्यधाम असेही म्हणतात, हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे, महाराजांनी पेटवलेली अग्नीकुंड (धुमि )आजही कायम पेटत आहे। या मठाची वास्तू महाराजांच्या इच्छे प्रमाणे शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेला आहे। या मठा मध्ये प्रवेश करताच परमार्थात लीन होऊन परम पावण होतो। भक्तांच्या मनातील, मनोभावे केलेली प्रार्थनेने मन प्रसन्न होऊन आत्म्याला शांती समाधान पावते। मठातील वातावरण शांत व ठंडगार आहे। या मठा मध्ये ब्राह्मणांच्या हस्ते नित्य नामजप व पूजाअर्चा केली जाते। सोमवार व शिवरात्रिला मठा मध्ये श्री रामलिंगला अभिषेक करण्यात येतो व नित्य भाविक भक्तगण श्री शांडिल्य महाराज मठला जावुन दर्शन घेऊन येतात।
श्री सद्गुरू शांडिल्य महाराज हे दैवी गुणाणी भरलेले योगी होते। ते साक्षात ईश्वरी आवतार, जनकल्याणासाठी गावोगावी फिरून देह झीजविला, अशा महान व थोर योगी श्री शांडिल्य महाराज लोंढा गावाच्या भुमिवर आवतरले। महाराजांच्या चरणाने स्पर्श झालेले लोंढा हे गाव संपुर्ण पंचक्रोशीत पावण झाले आहे। महाराजांचा महिमा अपरंपार आहे, त्यांचा वाणीतून बाहेर पडलेला शब्दांनी भक्तगण सुखी झाले आहेत। श्री शांडिल्य महाराज हे सामान्य योगी नसुन सामर्थ्यवान तपस्वी, सर्व सिद्धीचा दाता, जगत कल्याणच्या कार्यासाठी कार्य करीत जेथे साधु संतांचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध स्थान श्री काशी विश्वनाथ (प्रयागराज) येथून निघुन जिथे मुक्ती पदाला पावते, ते म्हणजे श्री क्षेत्र गोकर्ण (कारवार) येथे महाराजांनी जिवन मरण चक्रातून शेवट घेत जगदोदार कार्य केले, ते महान सिद्धी योगी श्री श्री श्री सद्गुरू शांडिल्य महाराज यांच्या चरणी माझे नत मस्तक।
बेळगांव व कारवार जिल्ह्य़ाचा सीमेवर पुरातन काळापासून वसलेले हे गाव म्हणजे लोंढा। काळी नदी व पांढरी नदीचा संगमावर स्थित, वन प्रदेशानी व्यापलेला, रेल्वेमार्ग वाहतूकी साठी नावाजलेला, निसर्ग सौंदर्य व सर्व धर्म समभाव, या गावाच वैशिष्ट्य। या गावात परंपरेनुसार धार्मिक कार्यक्रम, सर्व जाति धर्माचे कार्यक्रम एकत्र पालन करत असतात। या गावात दैवी शक्तीचा साठा अपार आहे, येथे अनेक देवदेवतांची व संत महात्म्याची मंदिरे आहेत। त्या मध्ये एक श्री सद्गुरू शांडिल्य महाराज मठ। महाराजांना निवासस्थानासाठी गावाच्या सीमेवर मठ बांधण्यासाठी लोंढा गावचे मुळ रहीवासी मिरासदार मिराशी कुटुंबिय व पंच मंडळी यांचा बहुमोलाचा वाटा आहे।
श्री सद्गुरू शांडिल्य महाराजांची महिमा अपरंपार आहे। महाराज सिद्धी प्राप्त योगी होते, महाराजांच सुदृढ शरिर व चेहऱ्यावरचे तेज व मुखातून अखंड नामजप याच वर्णन करावे तितके कमीच आहे। श्री शांडिल्य महाराज कोठून आले हे लोंढा वासियाना माहीत नव्हते। महाराज स्नान करण्यासाठी दोन्ही नदीचा संगमावर दगडावर बसले होते, नदीकाठावर फेरफटका मारणारे काही लोकांनी महाराजांची वार्ता गावभर पसरली। हि बातमी गावातील प्रमुख व पंच मंडळींच्या कानावर पडताच सर्वानी घटनास्थळी महाराजांची भेट घेऊन विचारपूस केली। गावकरी मंडळी व महाराज यांच्या मध्ये वार्तालाप झाली, त्या क्षणी महाराजांना गावामध्ये येण्यासाठी आग्रह केला। महाराजांनी ग्रामस्थ मंडळींच्या आग्रहाखातर महाराज लोंढा येथे येण्यासाठी तयार झाले। महाराजांचा निवासासाठी सूचनेप्रमाणे जागा उपलब्ध करून देण्यात आली। तेथे शांडिल्य महाराज मठ बांधण्यात आला। लोंढा परिसरातील व पंचक्रोशीतील जनतेला भक्तीच्या व नामाच्या योगे करून गावाची शोभा वाढविली।
श्री शांडिल्य महाराज हे ब्रह्मचर्य योगी होते। महाराज ज्या ज्या भागात भेट देऊन तेथील भक्त मंडळी आग्रहास्तव भेट देवुन जगत कल्याणाच कार्य करत शिवलिंगाची स्थापना करण्यात येत असे व त्यांच्या सामर्थ्याचा योगेकरून अदृश्य अवस्थेत असलेली शिवलिंग त्यानी दाखवुन त्याची पूजाअर्चा करून तेथे मंदिर व मठाची स्थापना करण्यात आली। त्या सर्व वास्तूचा श्री शांडिल्य महाराजांचा नावाने प्रसिद्ध आहेत। महाराजांच वास स्थान जंगलात, नदी तीरावर किंवा निर्जन स्थळी आशा ठिकाणी महाराज राहत असे। महाराज दररोज पूजापाठ, ध्यानधारणा, भक्तमंडळी आग्रहास्तव गावोगावी फिरून मार्गदर्शन करत होते।
एके दिवशी महाराज रेल्वे प्रवास करीत असता रेल्वे कर्मचारी (टीकेट कलेक्टर) महाराजांकडे टीकेट विचारले, महाराजांकडे टिकेट नसल्या कारणे उतरविण्यात आले। महाराज काहीही न बोलता उतरले व तेथून निघाले। वेळेनुसार गाडी जाण्यासाठी सुरू करण्यात आली तेव्हा गाडी पुढे ही न मागेही जाईना, सर्व रेल्वे कर्मचारीवर्ग धावपळ सुरू झाली। वेळ निघून गेली तरिही गाडी जागा हलेना, ही सर्व धावपळ बघुन रेल्वे प्रवास करण्याऱ्या प्रवाशांनी घडलेली सर्व हकिकत स्टेशन प्रबंधकाना कळवली। ही बातमी वाऱ्यासरशी चहूकडे पसरली। स्टेशन प्रबंधकानी त्या टिकेट कर्मचारीला बोलावून घेऊन घडलेली सर्व हकिकत विचारले व त्यांनी महाराजांची माफी मागण्यासाठी सुचविले, आश्चर्याची गोष्ट म्हणजे महाराजांची माफी मागण्यासाठी शोधण्याचा प्रयत्न करीत असता, महाराज कुणाच्याही दृष्टीत न पडता तेथे अदृश्य झाले। महाराज न भेटल्या मुळे रेल्वे कर्मचारी आपल्याकडून घडलेल्या चुकीबद्दल मनापासून क्षमा मागितली। महाराजांना माहीत नाही असे ही नाही, महाराज सतपुरूष व अंतर्यामी दृष्टीने घडलेला प्रकारा साठी भक्तांना चमत्कार शिवाय नमस्कार नाही हा बोध मिळतो, क्षमा याचना केल्यावर लगेच गाडीला काहीही न करता जाण्यासाठी निघाली। महाराजांना जेथे जाण्यासाठी निघाले होते तेथे गाडी पोहोचण्याच्या आगोदर महाराज त्या स्टेशन वर पोहचले होते, बोगी मधील प्रवासी महाराजांना बघुन आश्चर्य व्यक्त केले व महाराजांचा महिमा गुणगान झाले।
श्री सद्गुरू शांडिल्य महाराज खानापूर व जोयडा तालुक्यातील अनेक गावाना भेट दिली आहे। काही ठीकाणी भक्तीच्या सामर्थ्यानी शिवलिंगाची स्थापना केली आहे। जेथे इतर मठ मंदिरे आहेत तेथेही महाराजांनी पाद स्पर्श करून भक्तांना कृतकृत्य केले। या भागातील श्री हंडीभडंगनाथ मठ, बाळेवाडी मठ, कीरावळा मठ, व अन्य मठाना भेट दिली। श्री शांडिल्य महाराज वास्तव असलेल्या मठापैकी -
श्री शांडिल्य महाराज मठ, ( लोंढा )
श्री शांडिल्य महाराज मठ, ( कुंभारवाडा )
श्री शांडिल्य महाराज मठ, ( अवरोळी )
श्री शांडिल्य महाराज मठ, ( गोकर्ण )
या सर्व मठा मध्ये श्री शांडिल्य महाराज जयंती व पुण्यतिथी उत्सव साजरी करण्यात येते।
To be continued...
- रवींद्र मिराशी


The Best Slots | Casino Roll
ReplyDeleteThe best slots wooricasinos.info at 바카라 Casino Roll. If you love หารายได้เสริม table games, to play blackjack, you https://octcasino.com/ have to bet twice for the dealer casino-roll.com to win. The dealer must